जिल्ह्यातील संगमेश्वर पाठोपाठ रत्नागिरीत देखील कोरोनाचे ४ नवे रुग्ण सापडले
आज काही वेळापूर्वीच संगमेश्वर येथे ४ कोरोना बाधित रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असतानाच आता रत्नागिरीमध्ये देखील ४ कोरोना बाधित रुग्णांचे अहवाल पॉजिटिव आले आहेत. रत्नागिरीत पॉजिटिव्ह आढळलेल्या चार पैकी तीन जण मुंबईहून आलेले आहेत त्यांना क्वारंटाइन करून ठेवण्यात आले होते यातील एक रुग्ण रत्नागिरीतील आहे हा रुग्ण आधी पॉजिटिव आलेल्या एका रुग्णाच्या संपर्कात आला होता यामुळे आज रत्नागिरीत जिल्ह्यात ८ कोरोना बाधीत रुग्ण सापडले आहेत.आतापर्यंत रत्नागिरी जिल्ह्यात अॅक्टिव कोरोना बाधित ४२ रुग्ण आहेत तर आतापर्यंत जिल्ह्यात एकूण ४८ रुग्ण सापडले आहेत त्यातील ५ जणांना या अगोदरच डिस्चार्ज देण्यात आला आहे तर १ मृत्यू झाला होता.
www.konkantoday.com