
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेतर्फे आमदार शेखर निकम यांचा सत्कार
कृषी शिक्षण धोरण निश्चितीसाठीच्या तज्ञांच्या राज्यस्तरीय समितीत सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल आमदार शेखर निकम यांचा रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकार बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्र राज्याच्या कृषी शिक्षण धोरण निश्चितीसाठी माजी कुलगुरू डॉ. एस. एन. पुरी यांच्या अध्यक्षतेखाली तज्ञांची समिती शासनाने स्थापन केली आहे. या समितीत सदस्यपदाची जबाबदारी आमदार शेखर निकम यांच्यावर सोपविण्यात आल्याबद्दल बँक संचालक मंडळाच्यावतीने हा सत्कार करण्यात आला. उपाध्यक्ष बाबाजीराव जाधव, ज्येष्ठ संचालक जयवंत जालगांवकर, कार्यकारी संचालक सुनिल गुरव, सरव्यवस्थापक अजय चव्हाण यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी बँकेच्या प्रधान कार्यालयातील सत्कार समारंभाला उपस्थित होते.
www.konkantoday.com