
रेल्वे रुळावर थकून झोपलेले १४ मजूरांचा मालवाहू रेल्वेखाली सापडून अंत
औरंगाबाद तालुक्यातील सटाणा शिवारात ( करमाड डीएमआयसी परिसर) रेल्वे रुळावर थकून झोपलेले १४ मजूर मालवाहू रेल्वेखाली चिरडले गेले. हा भीषण अपघात पहाटे घडला. यात २ मजूर गंभीर जखमी असून, तिघे जीव वाचविण्यात यशस्वी ठरले आहेत. सर्व मजूर मध्य प्रदेश येथील असून, ते जालना येथे लॉकडाऊनमध्ये अडकले होते. घराच्या ओढीने सर्व मजूर पायी रेल्वे रुळाच्या मार्गे निघाले होते.
www.konkantoday.com