उद्यापासून रत्नागिरी जिल्ह्यात लॉक डाऊनमध्ये अडकलेल्यांना राज्यातील इतर काही जिल्ह्यात जाण्यासाठी एसटी बसेसची सुविधा उपलब्ध
लॉकडाउन काळात जे नागरिक रत्नागिरी जिल्ह्यात अडकून राहिले आहेत त्या नागरिकांना महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात जाण्यासाठी काही अटी व शर्ती राखून प्रवासासाठी परवानगी देत असल्याची माहिती रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली आहे.या प्रवाशांच्या सुविधेसाठी एसटी महामंडळाच्या बसेसची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत.प्रवास करणाऱ्या नागरिकांनी वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे तसेच एसटी सुटण्या अगोदर २ तास आधी ज्या मुख्यालयातून गाडी सुटणार आहे तेथे हजर राहणे आवश्यक आहे.तसेच संपूर्ण प्रवासात मास्कचा वापर अनिर्वाय आहे.सोबतच्या वेळापत्रकाप्रमाणे बसेस सुटण्याचे नियोजण करण्यात येत आहे.
www.konkantoday.com