चिपळूणात खांदाटपालीसह आजूबाजूचा परिसर पूर्णपणे सील

चिपळूणात आढळून आलेला हा बाधित रुग्ण खांदाटपाली येथील असून तो एका खाजगी कंपनीत कामाला आहे. २३ एप्रिल रोजी मुंबई काळाचौकी येथून तो येथे आला होता.मुंबई जे.जे हॉस्पिटलमध्ये त्याने वैद्यकीय चाचणी देखील करून घेतली होती. त्याच्याबरोबर अन्य दोघेजण देखील आले आहेत. मुंबई येथून अब्युलन्सने हे लोक येथे आले होते. अशी माहिती देखील प्रशासनाने दिली आहे. खांदाटपालीसह आजूबाजूचा परिसर पूर्णपणे सील करण्यात आला आहे.या परिसरात जाण्यास किंवा येथून बाहेर पडण्यास देखील बंदी घालण्यात आली आहे. तसेच येथे पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.तसेच येथून ३ की.मी आणि ५ किमी परिसरात कंटेंटमेंट झोन आणि बफर झोन अशी विभागणी करून पोलीस चेक नाके तयार करण्यात आले आहेत.
खांदाट,पाली,नवीन कोळकेवाडी,दळवाटने,कलंबसतें,वालोपे,खेड तालुक्यातील आंबडस,काडवली,या गावाना कंटेंटमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. तर बफर झोनमध्ये खेर्डी,चिपळूण शहर,चिपळूण उपनगर,निरबाडे,पेढे,तर खेड तालुक्यातील चिरणी,भेळसाई,केळणे,काडवली या परिसराचा समावेश करण्यात आला आहे.
बाधित रुग्णाच्या बरोबर मुंबईतून आलेले तसेच बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्याना क्वारंटाईन करण्यात आले असून त्यांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button