पत्रादेवी चेकपोस्टवर दारुसह १२ लाख ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त

अत्यावश्यक वस्तू वाहतुकीचा परवाना मिळविलेल्या ट्रकमधून गोवा बनावटीच्या दारु वाहतुक करणार्‍यावर बांदा पोलीसांनी कारवाई केली. या कारवाईत ६५ हजार रुपयांच्या दारुसह १२ लाख रुपयांचा ट्रक (एमएच १० सीआर ०६२०) असा एकूण १२ लाख ६४ हजार ७१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. बेकायदा दारु वाहतुक प्रकरणी आमिर आदम वाळवेकर व हसन अल्लाउद्दीन पटेकरी (दोघेही रा. इचलकरंजी, ता.हातकणंगले जि.कोल्हापूर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला हा ट्रक गोव्यातून कोल्हापूरकडे
जात हाेता
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button