लॉकडाऊनमुळे अडकलेल्या स्थलांतरित कामगार, यात्रेकरु, विद्यार्थी यांचे साठी महाराष्ट्र शासनाची कार्यपद्धती निश्चित
राज्यात किंवा राज्याबाहेर लॉकडाऊनमुळे अडकलेल्या स्थलांतरित कामगार, यात्रेकरु, विद्यार्थी तसेच इतर नागरिकांना इच्छित स्थळी जाण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कार्यपद्धती निश्चित केली आहे. यानुसार, सर्व जिल्हाधिकारी हे नोडल अधिकारी असतील. तसेच मंत्रालयातील नियंत्रण कक्षाद्वारे यावर देखरेख ठेवली जाईल. याबाबतीत अतिशय काळजीपूर्व आणि जबाबदारीने सर्व यंत्रणांनी अंमलबजावणी करावी असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.
मंत्रालयात महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ नितीन करीर, महिला बाल विकास प्रधान सचिव आय.ए कुंदन, तसेच संचालक , आपत्ती व्यवस्थापन अभय यावलकर यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
www.konkantoday.com