प्रज्ञा कुणाल जगताप या अभियंता महिलेने ‘एम-19 फेस शिल्ड’ची निर्मिती करून मोफत वाटप केले
एका आंतरराष्ट्रीय संस्थेत भारतातील प्रमुख पदावर कार्यरत असलेल्या लांजा येथील प्रज्ञा कुणाल जगताप या अभियंता महिलेने ‘एम-19 फेस शिल्ड’ची निर्मिती करून मोफत वाटप केले. महत्त्वाचे म्हणजे ही सर्व फेस शिल्ड त्यांनी स्वखर्चातून बनवली आहेत. त्याचे डिझाईन अमेरिकेमधील बोस्टनच्या फॅब लॅबने केले असून ते डब्लू. एच. ओ. ने मान्य केले आहेत. जगभरात थैमान घातलेल्या कोरोना प्रादुर्भावाच्या कठीण काळात जगताप यांचे हे काम लक्षणीय ठरले आहे.कोरोनासारख्या आजाराविरुद्ध लढा देणार्या आणि अत्यावश्यक सेवा पुरविणार्या लोकांचे संरक्षण व्हावे, या उद्देशाने त्यांनी हे ‘फेस शिल्ड’ बनविण्याचा निर्णय घेतला.फॅब लॅब’ या आंतरराष्ट्रीय संस्थेसाठी संपूर्ण भारतभर काम करीत असलेल्या प्रज्ञा जगताप यांनी स्वयंप्रेरणेने हे ‘सुरक्षा कवच’ बनविले आहेत.कोरोना महामारीच्या काळात त्यांनी बनविलेले हे फेस शिल्ड लांजातील डॉक्टर्स, पोलिस दल, सरकारी आरोग्य विभाग, मेडिकल दुकानदार, सफाई कामगार, भाजी, फळ विक्रेते या सर्वांचे संरक्षण व्हावे, या हेतूने त्यांना मोफत वाटप करीत आहेत.या कामी त्याना त्याचे पती डॉ. कुणाल जगताप यांचा माेठा पाठिंबा मिळाला आहे
www.konkantoday.com