लॉक डाउन मधील सवलतींचा स्पष्ट खुलासा होणे गरजेचे -सामाजिक नेते संतोष सावंत
राज्याच्या ज्या जिल्ह्यात काेराेनाचा प्रभाव कमी आहे.अशा जिल्ह्यांना उद्योगाबाबत काही सवलती देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.या सवलती जाहीर करताना त्या नेमक्या कोणत्या उद्योगासाठी आहेत हे स्पष्टपणे जाहीर करणे गरजेचे आहे.मच्छीमारीसाठी परवानगी दिल्यानंतर शासनाने आता सुरक्षित अंतर घेऊन मच्छी विक्रीलाही परवानगी दिली आहे.त्याआधी चिकन व मटण विक्रीलाही परवानगी होती.केंद्र सरकारने जाहीर केल्याप्रमाणे काल इलेक्ट्रॉनिक्स फोन रिचार्ज दुकाने ,स्टेशनरी उघडण्यास परवानगी दिली आहे.मात्र त्याबाबतचा अंतिम निर्णय राज्य शासनाने घ्यायचा असेही सांगितल्याचे त्यामुळे अशा दुकानांना आपल्या जिल्ह्यात परवानगी आहे का? असल्यास नेमकी कोणत्या दुकानांचा त्यामध्ये समावेश होतो याचे स्पष्टीकरण होणे गरजेचे आहे. एकीकडे लोक बाहेर पडू नयेत म्हणून प्रयत्न केले जात आहेत.बाहेर पडणाऱ्यांना पोलिसांकडून दंडही केला जात आहे. त्यामुळे अशी दुकाने उघडल्यानंतर ग्राहकाला तेथे खरेदीसाठी जाणार या सर्वांमुळे जनतेत संभ्रम निर्माण झाला आहे.याबाबत नामदार उदय सामंत यांनी लक्ष्य घालणे गरजेचे आहे व या कामी जनतेला स्पष्ट माहिती मिळावी यासाठी प्रशासनानेही स्पष्ट खुलासा करणे गरजेचे आहे.याबाबत प्रशासनाने योग्य ते मार्गदर्शन करावे अशी मागणी सामाजिक नेते संतोष सावंत यांनी केली आहे
www.konkantoday.com