लॉकडाऊन काळात पोस्ट खात्याची लाल वाहने आणि कर्मचारी देशभरात औषधांची वाहतूक करणार
देशातील कोरोना महामारीच्या काळात गंभीर आजारी रुग्णांना जीवरक्षक औषधांचा तुटवडा जाणवू नये यासाठी आता भारतीय पोस्ट खाते पुढे सरसावले आहे. देशातील लॉकडाऊन काळात पोस्ट खात्याची लाल वाहने आणि कर्मचारी देशभरात औषधांची वाहतूक करणार आहेत.
भारतीय टपाल सेवा (इंडिया पोस्ट) जगातली सर्वांत मोठी टपाल सेवा आहे आणि कोरोना संक्रमणाच्या काळात या विभागाने लोकसेवेचा आणखी एक नवा विडा उचलला आहे
त्यामुळे ज्या भागांमध्ये वैद्यकीय साहित्य आणि औषधांची सर्वाधिक गरज आहे, तिथपर्यंत या वस्तू पोहोचवण्याचं काम टपाल खाते करीत आहे
www.konkantoday.com