दिवा मुंबई येथुन उपाशी पोटी’ चालत प्रवास करत गावी येत असलेल्या१४ जणांना पोलिसांनी क्वारंटाइन केले
दिवा मुंबई येथे राहणारे खेड तालुक्यातील तुंबाड, सवनस ,येथील १४ जण तब्बल तीन दिवस ‘उपाशी पोटी’ चालत प्रवास करत जंगलमय भागाचा आधार घेत गावी दाखल होणाऱ्या १४ जणांना येथील पोलिसांनी महामार्गावरील नातुनगर येथे थांबवण्यात आले. या मध्ये एका ७ वर्षीय बालिकेचा देखिल समावेश असून दोन्ही पाय सुजलेल्या अवस्थेत हि बालिका त्यांच्या समवेत चालत गावाच्या ओढीने येत हाेती प्रशासनाने त्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना पोटभर जेवणाची व्यवस्था करून खेडमध्ये त्यांना क्वारंटाइन करून ठेवण्यात आले आहे.
www.konkantoday.com