गंगातीर्थावर होणारी गर्दी टाळण्यासाठी गंगातीर्थाकडे जाणारा मार्ग बंद
राजापूरपासून जवळच असलेल्या उन्हाळे येथील गंगामाईचे १५ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान आगमन झाले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गंगातीर्थाकडे जाणारा मार्ग बंद करण्यात आला आहे. त्यामुळे भाविकांना सध्या गंगास्नानाचा आनंद घेता येणार नाही.गंगातीर्थावर होणारी गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
www.konkantoday.com