
उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचा युपीएससी आणि एमपीएससी विद्यार्थ्यांना दिलासा
करोना विषाणूच्या संसर्गाने राज्यात लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात आला आहे. त्यामुळे या दरम्यान होणाऱ्या परीक्षांच्या आयोजनावरही टांगती तलवार आहे. याचा फटका युपीएससी आणि एमपीएससीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनाही बसणार आहे.
विशेष म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना वयोमर्यादेमुळे परीक्षा देण्याची ही शेवटची संधी होती त्यांच्या इथून मागील मेहनतीवर पाणी पडणार आहे. याचाच विचार करून राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी यावर्षी परीक्षा न देऊ शकणाऱ्या आणि वयोमर्यादा संपणाऱ्या विद्यार्थ्यांना 1 वर्ष मुदतवाढ देण्याचे आश्वासन दिले आहे
www.konkantoday.com