रत्नागिरी जिल्ह्यातील मिरज प्रयोगशाळा येथे पाठवण्यात आलेले कोरोना स्वॅब तपासणीचे १०३ अहवाल प्रलंबित
रत्नागिरी जिल्ह्यातील दि ९ ते ११ एप्रिल दरम्यान विविध गावांमधील संशयित रुग्णांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले.हे स्वॅब मिरज येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.त्या सर्व 103 स्वॅबचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.जिल्हा सामान्य रुग्णालयात 7 जण नव्याने दाखल करण्यात आले आहे तर 2 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.येथे दाखल एकूण व्यक्तींची संख्या 62 आहे.जिल्हयात होम क्वारंटाईन खाली 1053 व्यक्ती आहेत. लॉकडाऊन वाढवण्याच्या पार्श्वभूमीवर सर्वांवर अधिक लक्ष देण्यात येत आहे. त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी पोलीस दलातर्फे विकसित ॲप ची मदत घेण्यात येत आहे.संस्थात्मक क्वारंटाईन खाली असणाऱ्यांची संख्या 302 आहे.
www.konkantoday.com