राज्य उत्पादन शुल्क विभागानेऑनलाइन मद्य विक्रिला परवानगी दिलेली नाही
राज्य उत्पादन शुल्क विभागाने कुठल्याच अनुज्ञप्तींना ऑनलाइन मद्य विक्री करण्याची परवानगी दिलेली नाही. त्यामुळे नागरिकांनी यासंदर्भातील फसव्या जाहिरातींना बळी पडू नये, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत करण्यात आले आहे.
ऑनलाईन वाईन किंवा ऑनलाईन लिकर या मथळ्याखाली घरपोच मद्य सेवा दिली जाईल, अशा प्रकारच्या फेक मेसेजद्वारे समाज माध्यमांवर फसव्या जाहिराती दिल्या जात आहेत. ऑनलाइन पेमेंट स्वीकारले जाईल असे सांगून चोरट्यांकडून फसवणूक केली जात आहे.
या फसव्या जाहिरातींना बळी पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
www.konkantoday
com