
रत्नागिरी शहरातील कोरोनाबाधीत क्षेत्रावर ड्रोन कॅमेराद्वारे वॉच
रत्नागिरी शहरामध्ये राजिवडा, शिवखोल भागात एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला होता.त्यानंतर सदर भागापासून तीन किलोमीटर अंतरापर्यंत हा भाग कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला होता.काही दिवसांपूर्वी याच भागांमध्ये लोकांनी अनावश्यक जमाव केला होता.या भागामध्ये मोठय़ा प्रमाणात पोलीस बंदोबस्तही तैनात आहे.या बरोबरीने आता शहरातील दोन्ही कंटेनमेंट झोन वर ड्रोन कॅमेरांच्या सहाय्याने पाहणी करण्यात येत आहे असे रत्नागिरी पोलिसांनी सांगितले. नागरिकांनी कृपया घरीच राहून आम्हाला सहकार्य करावे, जर कोणी कायदा मोडून बाहेर फिरताना दिसलं तर उचित कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे देखील ते म्हणाले.
www.konkantoday.com
