जिल्हा शासकीय रुग्णालयातील कर्मचाऱयांची वरिष्ठांबद्दल नाराजी ,आ.राजन साळवी व सेनानेते किरण सामंत यांनी केली मध्यस्थी
जिल्ह्यात सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून यामुळे शासकीय जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर्स तसेच वैद्यकीय कर्मचाऱयांवर मोठा ताण आहे.अशातच रुग्णालय कर्मचाऱ्यांना अपुऱया सुविधांमुळे कर्मचारी नाराज असतानाच वरिष्ठांच्या कारभारामुळे कर्मचाऱयांच्यात नाराजी निर्माण झाल्याने आज रुग्णालयातील कर्मचारी रुग्णालय आवारात एकत्र जमा झाले.सध्याच्या गंभीर स्थितीत कर्मचाऱ्यांचा प्रश्न निर्माण झाल्याने आज सकाळी आमदार राजन साळवी व शिवसेना नेते किरण सामंत यांनी रुग्णालयात धाव घेतली व व कर्मचाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले.यावेळी कर्मचाऱयांनी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याबाबत तक्रारी केल्या. शेवटी आमदार साळवी व किरण सामंत यांनी हा प्रश्न जिल्हाधिकारी यांच्यासमोर मांडूया असे सांगून कर्मचाऱ्यांची समजूत घातली.त्यानंतर कर्मचाऱ्यांच शिष्टमंडळ घेऊन आ.साळवी व सामंत यांनी जिल्हाधिकारी यांच्यासमोर कर्मचाऱयांचे प्रश्न व तक्रारी मांडल्या.यानंतर जिल्हाधिकारी यांनी कर्मचाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर योग्य त्या सूचना जिल्हा शल्य चिकित्सकांना केल्या.त्यामुळे सध्यातरी या प्रकरणावर पडदा पडला आहे.
www.konkantoday.com