पाचल विभागातील २५ गरिब व गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तुंचे वाटप
भाजपाचे युवानेते माजी खासदार निलेश राणे, रवींद्र नागरेकर आणि तालुका अध्यक्ष अभिजित गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पाचल विभागातील भाजपाचे युवा कार्यकर्ते समिर खानविलकर यांनी पाचल विभागातील २५ गरिब व गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तुंचे वाटप केले आहे. लॉकडाऊनच्या काळात गैरसोय झालेल्या या कुटुंबीयांना खानविलकर यांनी अशा प्रकारे मदत केल्याने त्यांचे या परिसरात कौतुक होत आहे.
www.konkantoday.com