
चिपळूण रेल्वे स्थानक परिसरात सुशोभिकरणाचे काम वेगाने सुरू
चिपळूण शहरालगतच्या वालोपे येथील चिपळूण रेल्वे स्थानक परिसराला लवकरच नवा साज चढणार आहे. सुमारे पाच कोटी रुपये खर्च करून रेल्वे प्रवेशद्वार परिसराचे सुशोभिकरण केले जात आहे. विशेष म्हणजे मुंबईच्या धर्तीवर या ठिकाणी दुचाकी व चारचाकी पार्किंगसाठी प्रोफ्लेक्स रूफिंग शेड उभारली जाणार आहे. ती शेड प्रवाशांचे आकर्षण ठरणार आहे. याशिवाय येथे गार्डन, कॉंक्रीटीकरण, पेव्हर ब्लॉकसह सुशोभिकरणाचे काम संबंधित ठेकेदाराने हाती घेतले आहे. या कामाला गती आली असून आतापर्यंत सुमारे ६० टक्के काम मार्गी लागले आहे. www.konkantoday.com