चाकरमान्यांनी केले उद्योग, घरी परतण्यासाठी जीवंत काकीला मृत दाखविले ,पोलिसां समोर बनाव उघड

संपूर्ण राज्यात जिल्हा बंदी केली आहे त्यामुळे मुंबईतील अनेक चाकरमानी गावाकडे येऊ शकत नाही तरी गावाची ओढ लागलेले चाकरमानी नव्या शक्कली लढवत आहेत मुंबई गावाकडे परतण्यासाठी दोन तरुणांनी आगळी शक्कल लढवली मुंबईतील हे तरूण दुचाकीवरून जिल्ह्यातील राजापूर येथे येण्यास निघाले अनेक ठिकाणी नाकाबंदीत त्यानी आपली काकी मयत झाल्याचे सांगून सुटका करून घेतली खेड येथे भरणा नाका त्या तरुणांना अडवण्यात आले या तरुणानी येथेही काकीच्या निधनाचे कारण सांगितले परंतु त्यावेळी ड्युटीवर असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षकांना शंका आली त्यांनी या तरुणांना राजापूरला व्हिडिओ कॉल करायला सांगितला या तरुणानी आपल्या शक्कलीची घरच्यांना आधीच कल्पना दिली असल्यामुळे काकीनेही जिवंतपणी पांढरा कपडा अंगावर घेऊन आपली मयत झाल्याचे भूमिका पार पडली तरी देखील पोलिसांचे समाधान होईना म्हणून त्यानी गावच्या पोलीस पाटलाला या प्रकाराची खात्री करून घेण्यासाठी घरी पाठविले काकी जीवंत असल्याचे पोलीस पाटलांनी सांगितले आणि तेथेच या तरुणांचा बनाव उघड झाला नाका बंदीतून सुटका होण्यासाठी हा बनाव असल्याचे उघड झाल्यावर पोलिसांनी या दोन तरुणांची दुचाकी जप्त केली असून त्यांना खेडमध्ये क्वारंटाइन करून ठेवले आहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button