कोरोना वायरसशी लढण्यासाठी आता भारतीय रेल्वेही सज्ज,रेल्वेत बनवले आयसोलेशन वॉर्ड
देशात कोरोना व्हायरस फोफावताना दिसत आहे.देशातील विविध रुग्णालये या कोरोना व्हायरस विरोधात लढण्यासाठी सज्ज झालेली आपण पाहिली आहेत.परंतु आता यामध्ये भारतीय रेल्वेची भर झाली आहे.भारतीय रेल्वेने आपल्या काही रेल्वेगाड्यांचे रूपांतर हॉस्पिटलमध्ये करणार आहे.या मध्ये बोगीचे रूपांतर आयसोलेशन वॉर्डमध्ये करण्यात येणार आहे.या वॉर्डमध्ये व्हेंटिलेटरपासून अत्यावश्यक असणाऱ्या सर्व गोष्टींची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.खालील गाडी ही आसाममधील कामाख्या येथील नमुना गाडी आहे.यामध्ये लागणाऱ्या सर्व मेडिकल सुविधा आहेत तसेच प्रत्येक बोगीमध्ये नऊ रुग्णांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
www.konkantoday.com