मालगुंड जवळ टेम्पोतून पडल्याने शाळकरी मुलाचा मृत्यू


रस्त्यात घातलेल्या गतिरोधकावर टेम्पो आपटल्याने टेंपोत बसलेल्या शाळकरी मुलगा बाहेर फेकला जाऊन टेम्पोला जोडलेल्या कॉम्प्रेशन मशिनच्या चाकाखाली गेल्याने मृत्युमुखी पडला अथर्व घवाळी वय.१४, राहणार धावडेवाडी मालगुंड असे मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे यातील टेम्पोचालक ओंकार शितप हा टेम्पोला जोडून कॉम्प्रेसर मशीन घेऊन येत असताना वाटेत टेम्पोमध्ये शाळकरी मुले बसली हा टेम्पो मालगुंड धावडेवाडी फाट्याजवळ आला असता टेम्पोचालकाने रस्त्याची परिस्थिती लक्षात न घेता गतिरोधकावरून जोरात गाडी नेली त्यामुळे हौदात बसलेला अथर्व हा रस्त्यावर फेकला गेला आणि टेम्पोच्या मागे जोडलेल्या कॉम्प्रेसर मशीन खाली आल्याने त्याचे चाक अंगा वरून गेल्याने त्याचा मृत्यू झाला टेम्पो चालकांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे .
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button