जयगड बंदरात नादुरुस्त उभ्या असलेल्या जहाजामुळे जल प्रदूषण,मच्छिमारीवर परिणाम
रत्नागिरी जवळील जयगड बंदरात गेल्या काही महिन्यापासून नादुरुस्त झाल्यामुळे उभ्या असलेल्या जहाजामुळे जल प्रदूषण होत असल्याची तक्रार मच्छीमारांकडून होत आहे या जहाजाच्या इंजिनचे दुरुस्तीचे काम गेले अनेक महिने चालू आहे सध्या या जहाजातील डिझेल अन्य जहाजात भरण्याचे काम सुरू असून हे काम चालू असताना यातील डिझेल समुद्रात मोठय़ा प्रमाणावर पडत असल्याने जलप्रदूषण होते याचा मच्छीमारीवर विपरीत परिणाम होत आहे
www.konkantoday.com