वंध्यत्वावर धन्वंतरी रुग्णालयात मार्गदर्शन आणि मोफत तपासणी शिबिर
येथील अत्याधुनिक रत्नागिरी टेस्ट टयूब बेबी अॅ ण्ड रिसर्च सेंटरतर्फे येत्या रविवारी (दि. १ मार्च) दुपारी २ पासून वंध्यत्वावर धन्वंतरी रुग्णालयात मार्गदर्शन आणि मोफत तपासणी शिबिर आयोजित केले आहे. वंध्यत्व निवारणासाठी निपुत्रिक जोडप्यांना मार्गदर्शन दर महिन्याच्या पहिल्या रविवारी केले जाते.
शिबिरात प्रसिद्ध स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. तोरल शिंदे रुग्णांची मोफत तपासणी करतात.रविवारी होणाऱ्या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी (०२३५२) २२१२८२ किंवा ९५२७०४४९०१ या क्रमांकावर संपर्क साधावा.
www.konkantoday.com