फक्त ४०० शेतकर्यांयनीच आंबा मानांकन नोंदणी केली
आंबा हे कोकणातील प्रमुख पीक आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात ४० ते ५० हजार आंबा बागायतदार असताना केवळ ४०० शेतकर्यां नी जीआय मानांकनासाठी नोंदणी केली आहे. परंतु यावर्षी जीआय मानांकन नसताना हापूस नावाचा वापर केल्यास बागायतदारांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. तर खाजगी कंपन्यांसह पणन मंडळाने आंबा निर्यातीसाठी जीआय मानांकन आवश्यक असल्याचे स्पष्ट केले आहे. कोकणातील पाच जिल्ह्यांमधील तयार होणार्याा हापूस आंब्याला जीआय मानांकन मिळाले आहे. हापूसचा टॅग वापरायचा असल्यास संबंधित आंबा उत्पादक, व्यापारी, प्र्रक्रिया उद्योजक, निर्यातदार यांना विहित शुल्क भरून नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी न करता हापूस नावाचा वापर केल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
www.konkantoday.com