कोकणातील शैक्षणिक परिस्थितीवर अभ्यास करण्यासाठी समिती–
तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत
कोकण विद्यापीठाचा ब्रँड तयार करणे अथवा उपकेंद्राचे सबलीकरण करून ती विकसित करणे, या दोन्ही गोष्टी आपण करू शकतो. परंतु या गोष्टी करत असताना प्राचार्य, प्राध्यापक तसेच येथील विद्यार्थी यांचे नुकसान होत नाही, याची काळजी घेणे, चर्चा करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केले.
स्वतंत्र कोकण विद्यापीठ करावे की उपकेंद्र विकसित करावे, याबाबत चर्चा करण्यासाठी गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील राधाबाई शेट्ये सभागृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते. जिल्ह्यातील प्राचार्य व प्राध्यापक यांच्यासमवेत त्यांनी चर्चा केली. यावेळी मुंबई विद्यापीठाचे डॉ. खराट, गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य अविनाश सुखटणकर, जगताप तसेच जिल्ह्यातील महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक उपस्थित होते. सामंत म्हणाले की, कोकणातील शैक्षणिक परिस्थितीवर अभ्यास करण्यासाठी तीन व्यक्तींची नावे सुचवावीत जे सविस्तर अभ्यास करतील आणि अहवाल सादर करतील. त्यामुळे याबाबत निणर्ंय घेणे सोयीचे होईल.
www.konkantoday.com