
साखरपातील पशु संवर्धक व्यंक्या लांबोरे यांना मनसेची मदत
साखरपा :- काही दिवसा पूर्वी साखरपा जवळील पुर्ये गावातील धनगर वाडीतील श्री व्यंक्या लांबोरे ह्याचा पशू सौवर्धन चा जीवनपट आणि आत्ता त्यांची खालावलेली परिस्थिती ह्याचावर अनेक वृत्तपत्र व समाज माध्यम ह्यातून बातम्या समोर आल्या होत्या.ही बातमी मनसे च्या पदाधिकाऱ्यांना समजताच तालुका संपर्क अध्यक्ष मनविसे श्री दिनेश मांडवकर आणि सह संपर्क अध्यक्ष श्री मनोहर गोताड ह्यांनी पुढाकार घेऊन मनसे तालुका अध्यक्ष / नगरसेवक श्री अनुरागजी कोचिरकर ह्यांचा उपस्थिती श्री व्यंक्या लंबोरे ह्यांचे डोंगर माथ्यावर असलेलं गाव प्रत्यक्ष मदत घेऊन गाठले.मनसेने मायेने त्यांच्या बरोबर केलेल्या विचारपूस आणि मदतीच्या हाताने श्री लंबोरे खूप भावनिक झाले होते. त्यांचे घर म्हणजे त्यात त्यांनी अजूनही दोन गायीची जोपासना याही वयात केलेली आहे आणि त्यांच्या जीवनातील त्याच त्यांच्या सोबती आहेत असे समजले. त्यांच्या घरची परिस्थिती अतिशय धोकादायक झालेली असून त्यांना शासकीय मदत मिळण्यास मनसे पाठपुरावा करेल असे श्री कोचिरकर ह्यांच्या कडून सांगण्यात आले. तसेच त्यांना दैनंदिन जीवनात लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंचे २-३ महिने पुरेल अशी मदत त्यांना सुपूर्द केली.श्री व्यंक्या लांबोरे यांच्या सारखी व्यक्तिमत्वे खरंच खूप विलक्षण असतात.त्यांना आपण जपलेच पाहिजे सध्या त्यांना मदतीची गरज असून ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी मदतीचा हात पुढे करावा असे आवाहन मनसे साखरपा पंचक्रोशीच्या वतीने करण्यात आले आहे.ह्या वेळी मनसे तालुका अध्यक्ष /नगरसेवक श्री अनुराग कोचिरकर, मनविसे सह संपर्क अध्यक्ष श्री मनोहर गोताड, मनविसे तालुका अध्यक्ष श्री सिद्धेश वेल्हाळ,देवरुख शहर अध्यक्ष श्री ऋतुराज देवरुखकर, प्रीतम गोताड, सचिन बने, तेजस निवले आणि महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.
www.konkantoday.com