रत्नागिरी नगराध्यक्ष पोटनिवडणूक २९ डिसेंबर रोजी तर ३० डिसेंबरला मतमोजणी व निकाल
रत्नागिरी नगर परिषदेच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून ही पोटनिवडणूक २९ डिसेंबरला हाेणार असून रत्नागिरीसह सावंतवाडीची देखील पोटनिवडणूक लागली आहे. शासनाच्या आदेशानुसार नामनिर्देशन पत्रे ४.१२.२०१९ पासून ८.१२.२०१९ पर्यंत स्विकारली जातील. १३ डिसेंबर रोजी छाननी होईल. १८ डिसेंबर रोजी अर्ज मागे घेण्याची मुदत राहिल. रविवार दि. २९ ला सकाळी ७.३० ते ५.३० पर्यंत मतदान होईल व ३० डिसेंबरला सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणी होवून निकाल जाहीर करण्यात येईल. या निवडणुकीची आचारसंहिता आजपासून लागू झाली आहे.
www.konkantoday.com