
रत्नागिरी जिल्ह्यात जून अखेर १ हजार ३६२ जणांकडे आत्मसंरक्षणा साठी शस्त्राचे परवाने
आत्मसंरक्षणासाठी परवानाधारक शस्त्र बाळगणे आता प्रतिष्ठेचे बनले आहे. जिल्हा शांतताप्रिय असला तरी आत्मसंरक्षणासाठी शस्त्र बाळगण्याचे प्रमाण २५ टक्के आहे. शेती संरक्षणाचे प्रमाण मात्र अधिक आहे. आत्मसंरक्षणाच्या नावाखाली शस्त्राचा गैरवापर केल्याचे प्रमाण अत्यल्प आहे. जिल्ह्यात जून २०२१ अखेर १ हजार ३६२ जणांकडे आत्म संरक्षणासाठी शस्त्राचे परवाने आहेत. शेती संरक्षणासाठी असलेले शस्त्र परवाने मात्र ३ हजार ४५६ आहेत. जिल्ह्यात एकूण ५ हजार २४३ शस्त्र परवानाधारक आहेत.
रत्नागिरी तालुक्यात ५१३ परवानाधारक आहेत. गुहागर तालुक्यात सर्वात कमी म्हणजे ४३ तसेच लांजा आणि मंडणगड तालुक्यातही लोकसंख्या कमी असल्याने या दोन्ही तालुक्यात ४८ लाख परवानाधारक आहेत. त्यामुळे आत्मसंरक्षणासाठी शस्त्र वापरणार्यां कडून तसा गैरवापर केल्याच्या घटना गेल्या दोन वर्षातघडलेल्यानाहीत
www.konkantoday.com