लहान मुलीवर अत्याचार करणाऱया ट्रक चालकाला जन्मठेप
खाऊचे आमिष दाखवून पाच वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करणारा ट्रक चालक मंजुनाथ लिंगाप्पा हसमणी (कर्नाटक)याला न्यायालयाने जन्मठेप व पंचवीस हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली .१८जून २०१८रोजी सायंकाळी पीडित चिमुरडी लहान मुलांसोबत घराशेजारी खेळत होती या संधीचा फायदा घेत बाजूच्या खोलीत राहणारा ट्रक चालक मंजुनाथ याने चिमुरडीला चहा बिस्कीटाचे आमिष दाखवून आपल्या खोलीत नेले तेथे तिच्यावर अत्याचार केला होता याबाबत मुलीच्या आईने फिर्याद केल्यावर आरोपीला अटक करण्यात आले होते .
www.konkantoday.com