
शहरातील थिबा पॅलेस परिसरात पैशाच्या वादातून वाहने जाळली
रत्नागिरी येथील थिबा पॅलेस परिसरात पार्किंगमध्ये वाहनाला आग लावल्याने या आगीत एक रिक्षा व तीन दुचाकींवर दोन सायकली जळून दीड लाखांचे नुकसान झाले याबाबत सलमान पावसकर यांनी रत्नागिरी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे
या प्रकाराला कोकण नगर येथील बन्सर केरला हा संशयित आरोपी असल्याची तक्रार पावसकर यांनी केली आहे.
कोकणनगर येथील बन्सर केरला याने पैशावरून झालेल्या वादातून ही वाहने जाळल्याचे पावसकर यांनी तक्रारीत नमुद केले आह़े
पावसकर याचे काही दिवसांपूर्वी कोकणनगर येथील बन्सर केरला उर्प बन्या याच्यासोबत पैशावरून वाद झाला होता. त्या रागातून केरलाने वाहनांची जाळपोळ केल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आह़े यापकरणी शहर पोलीस ठाण्यातील पोलीस हेड कॉन्स्टेबल कोकरे तपास करत आहेत.
www.konkantoday.com