
रत्नागिरीत दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत रंगणार फुलोत्सव २०१९
पुलोत्सव २०१९
स्वर आणि स्वरांकित सुहृद हे पु.ल. आणि सुनीताबाई यांच्या प्रेमाची स्थानं तर काव्य आणि नाटक हे चे हळवे कोपरे. याच मर्मस्थानांची गुंफण आहे यंदाच्या पुलोत्सवात….
वसंतराव देशपांडे, कुमार गंधर्व यांसारख्या अनेक कलाकारांबरोबर पु.ल.देशपांडे यांचे ऋणानुबंध अधोरेखित करणारा कार्यक्रम म्हणजे
*’स्वरांकित पु.ल’*
गायक- अभिषेक काळे, आदित्य मोडक
ऑर्गन-पं.विश्वानाथ कान्हेरे
तबला-रामकृष्ण करंबेळकर
निवेदन-अनघा मोडक
*८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता*
*स्वा.सावरकर नाट्यगृह, रत्नागिरी*
मोजक्या शब्दात भावनांचं सार सांगण्याची हातोटी या कवितेमध्ये असते आणि म्हणून प्रत्येक हळव्या मनाला कविता नेहमीच जवळची वाटत रहाते. अशी अनेक ऐकलेल्या न ऐकलेल्या कवितांची मुक्त मैफल पुलोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी सादर होणार आहे… *इर्शाद…. संदीप खरे आणि वैभव जोशी* या सृजनशील कवींच्या कविता *9 नोव्हेम्बर* रोजी.
तर दि. *10 नोव्हेम्बर* रोजी सादर होणार आहे कलांश थिएटर निर्मित *बिऱ्हाड* हा *दीर्घांक*….अशोक पवार यांच्या आत्मकथेवर आधारित या नाट्याचं लेखन केलंय अजिंक्य कोल्हटकर याने तर दिग्दर्शन केलंय अजिंक्य आणि मनोज यांनी!
*चुकवू नये असे सर्वांगसुंदर कार्यक्रम पुलोत्सवात…. दि. 8 9 10 नोव्हेम्बर सायंकाळी 7 वाजता स्वा. सावरकर नाट्यगृहात*