बोगस डॉक्टर प्रकरणातील खटल्यातून संशयित डॉक्टरची निर्दोष मुक्तता
वैद्यक व्यवसायासाठी आवश्यक प्रमाणपत्र नसताना तसा व्यवसाय केल्याच्या आरोपावून खटला दाखल झालेल्या एकाची राजापूर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकार्यांनी सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. प्रकाश रामचंद्र प्रभुदेसाई (ससाळे, ता. राजापूर) हे आवश्यक प्रमाणपत्र नसताना वैद्यकीय व्यवसाय करतात अशी खबर लागल्याने पोलीस आणि आरोग्य अधिकारी यांनी त्यांच्यावर छापा घातला. २३ मे २०१२ रोजी सकाळी ११ वा. हा छापा पडला. त्यावेळी प्रभूदेसाई यांच्याकडे ऍलोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेंदिक औषधांचा मोठा साठा सापडला होता.
www.konkantoday.com