रत्नागिरीचा सुपुत्र सुरज कांबळे महाराष्ट्र शासन कबड्डी संघाच्या कप्तानपदी
रत्नागिरी शहराजवळील मिर्या गावचा सुपुत्र सुरज कांबळे याची महाराष्ट्र शासन कबड्डी संघाच्या कप्तानपदी निवड झाली आहे. कप्तानपदी निवड झाल्याबद्दल त्याचे अनेकांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
केंद्र शासनाच्या विद्यमाने व हिमाचल प्रदेश शासनाच्यावतीने अखिल भारतीय नागरी सेवा कबड्डी स्पर्धा २०१९-२० शिमला हिमाचल प्रदेश येथे दि. १५ ते १९ नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्र शासनाच्या संघाची निवड चाचणी घेण्यात आली. यावेळी मिर्या गावचे सुपुत्र सुरज श्रीराम कांबळे (कोतवाल) यांची संघाच्या कप्तानपदी निवड करण्यात आली.
www.konkantoday.com