
शेतकरी विमा मिळताना कुटुंबातील अन्य व्यक्तींना विमाचा फायदा मिळावा
रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक शेतकर्यांना शेतकरी विमा दिला जात असून एखादा अपघात झाल्यावर हा विमा मिळतो. परंतु ज्याच्या नावावर शेती आहे त्यालाच हा विमा मिळत असल्याने अन्य व्यक्ती त्यापासून वंचित रहात असल्याने जे शेतकरी कुटुंबातील आहेत जे नोकरदार आहेत, ते वगळून अन्य सर्वांना हा शेतकरी विमा मिळावा अशी मागणी पंचायत समिती सदस्य ऋषिकेश भोगले यांनी केली आहे.
www.konkantoday.com