
चार्जिंगसाठी लावलेला मोबाइल रोकड रकमेसह चोरून नेला
रत्नागिरी जवळील हातखंबा येथे एका दुकानांमध्ये चार्जिंगला लावलेला मोबाइल व त्याच्या कव्हरमध्ये ठेवलेली रोख रक्कम चोरट्यांनी चोरून नेले आहेत.बारामती येथील राहणारे महेश घाडगे यांनी याबाबत ग्रामीण पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहेत घाटगे हे आपल्या कामानिमित्त हातखंबा आले होते त्या वेळी त्यांनी पेट्रोल पंपाशेजारील एका दुकानात मोबाईल चार्जिंगला लावून ठेवला होता या मोबाईलच्या कव्हरमध्ये दहा हजार रुपये होते काही वेळाने घाडगे हे मोबाइल नेण्यासाठी परत आले असता मोबाइल व त्यातील रोख रक्कम अद्यात चोरटयांने चोरल्याचे आढळून आले.
www.konkantoday.com