प्रवाशांच्या सोयीसाठी दिवाळीत एसटीच्या ४५ जादा गाड्या
राज्य परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागातर्फे दिवाळीसाठी जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रवाशांच्या सोईसाठी रत्नागिरी, मुंबई, पुणे मार्गावर ४५ जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. अक्कलकोट, विठ्ठलवाडी, भायंदर, मुंबई, ठाणे, चिंचवड, बोरिवली, भांडुप, स्वारगेट, सातारा, गारगोटी, तुळजापूर, पुणे, नालासोपारा या मार्गावर जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. याशिवाय दापोली-परळी, खेड-शिर्डी, चिपळूण-परळी, गुहागर-आंबेजोगाई, संगमेश्वर-गारगोटी, देवरूख-पंढरपूर, अक्कलकोट, रत्नागिरी-नांदेड, सातारा, राजापूर-इचलकरंजी, शिर्डी-मंडणगड-बीड या लांब पल्ल्याच्या थेट गाड्या देखील सोडण्यात येणार आहेत
www.konkantoday.com