माने महाविद्यालयाच्या प्रणय चाळकेला एअर पिस्टलमध्ये रौप्य पदक

आंबव येथील प्र. शि. प्र. संस्थेच्या राजेंद्र माने इंजिनीरिंग कॉलेजचा विद्यार्थि प्रणय चाळके याने मुंबई विद्यापीठांतर्गत १० मीटर एअर पिस्टल क्रीडा प्रकारात रौप्य पदक पटकाविले आहे.

ही स्पर्धा मुंबईमधील रूइया कॉलेजच्या शुटींग रेंजवर घेण्यात आली. १५ ते १९ ऑक्टोबर या काळात घेण्यात आलेल्या या झोनल स्तरावरील स्पर्धेमध्ये प्रणय याने ६०० पैकी ५५० गुण प्राप्त करून द्वितीय क्रमांक पटकाविला. त्याची यापुढील राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे. राष्ट्रीय स्पर्धा डॉ. करनीसिंग शुटींग रेंज दिल्ली येथे ११ नोव्हेंबर दरम्यान पार पडणार आहे.

प्रणय चाळके महाविद्यालयाच्या एम एम एस विभागातील द्वितीय वर्षाचा विद्यार्थी असून त्याने नाशिकच्या एक्सेल टार्गेट शुटींग क्लूब मधून एअर पिस्टलचे प्राथमिक प्रशिक्षण पूर्ण केले आहे. तो मूळ कर्ली गावचा असून गेली १० वर्षे तो या क्रीडा प्रकारात मेहनत घेत आहे. सध्या देवरुखमधील आठल्ये सप्रे शुटींग रेंजवर विद्यार्थ्यांना कोचिंग करत आहे.

रुईया कॉलेजमध्ये, प्राचार्य, क्रीडाविभाग डायरेक्टर आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बक्षीस वितरण समारंभात प्रणय याला रौप्य पदक प्रदान करण्यात आले.

त्याच्या या यशाबद्दल प्र. शि. प्र. संस्थेचे अध्यक्ष मा. रवींद्रजी माने, कार्यकारी अध्यक्षा सौ. नेहा माने, तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश भागवत, विभागप्रमुख प्रा. मोहन गोसावी व सर्व प्राध्यापकानी त्याचे विशेष अभिनंदन केले व भविष्यातील कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button