मंदीमुळे अडचणीत आलेली बाजारपेठ पावसामुळे थंड
दिवाळीचा सण तोंडावर आला असतानादेखील जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने जोर केला असून दिवसभर पाऊस सुरू असल्याने त्याचा परिणाम बाजारपेठेवर झाला आहे. आधीच मंदीमुळे बाजारपेठेतील उलाढाल कमी असतानाच आता दिवाळीला बाजारात तेजी येईल अशी व्यापार्यांची अपेक्षा होती. परंतु पावसामुळे दुकानदारांकडे ग्राहकांनी सध्या तरी पाठ फिरविली असल्याने व्यापारी हैराण झाले आहेत. सध्या मोठमोठ्या डिपार्टमेंट स्टोअरमुळे तसेच ऑनलाईन वरील वाढत्या खरेदीच्या कलामुळे व्यापारी अधिकच अडचणीत आले आहेत.
www.konkantoday.com