
कोकण किनारपट्टीवर वादळाचा धोका ,सावधानता बाळगण्याचे प्रशासनाचे आवाहन
कोकण किनारपट्टीवर चक्रीवादळामुळे पडणा-या वादळी पावसाचा धोका निर्माण झाला असून किनारपट्टीवरील क्षेत्रामध्ये सावधानतेच्या सूचना भारत भारतीय हवामान विभागाने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला असून कमी दाबाच्या क्षेत्राचे चक्रीवादळात रुपांतर होत आहे. त्यामुळेच दक्षिण कोकणात कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम जाणवणार आहे. २५ ऑक्टोबरला कोकण किनारपट्टी व रत्नागिरीकिनाऱ्यावर समुद्र खवळलेला राहणार आहे.
त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून सावधानतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या कालावधीत मासेमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जावू नये. तसेच जिल्ह्यातील सर्व समुद्र किनारे पर्यटक तसेच नागरिकासाठी बंद ठेवण्यात यावेत असे सांगण्यात आले आहे. या कालावधीत जिल्ह्यातील काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तरी नागरिकांनी सावधानता व सुरक्षितता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे
www.konkantoday.com