
महिला रुग्णालयाच्या जागी वैद्यकीय महाविद्यालय उभारून जनतेची दिशाभूल; शिवसेना जिल्हा समन्वयक संजय पुनसकर यांचा आरोप
रत्नागिरीत उद्यमनगर परिसरात यापूर्वी शासकीय महिला रुग्णालयाची उभारणी करण्यात आली. हे महिला रुग्णालय सुरू न होता त्याठिकाणी कोरोनात बालरुग्णालय आणि आता शासनाकडून परिपत्रक मंजूर करून नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात आले आहे.त्यामुळे महिला रुग्णालय सुरू न करता जनतेची दिशाभूल करण्याचे काम केले जात असल्याचा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हा समन्वयक संजय पुनसकर यांनी केला.
रत्नागिरी येथे 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व त्यास संलग्नित जिल्हा सामान्य रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून 430 खाटांचे जिल्हा रुग्णालय स्थापन करण्याचा शासन आदेश 2022 मध्ये पारित झाला. यासंदर्भात शिवसेनेतर्फे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) बुधवारी येथील खासदार संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यावेळी जिल्हा समन्वयक संजय पुनसकर, तालुकापमुख प्रदीप साळवी, विधानसभा क्षेत्रप्रमुख पमोद शेरे, शहर प्रमुख पशांत साळुंखे, माजी जि.प.अध्यक्ष जयसिंग घोसाळे, उपजिल्हापमुख संजय साळवी यांची उपस्थिती होते.
www.konkantoday.com