महायुती दोनशेच्या पुढे जाणार नाही मनोहर जोशींचा अंदाज
एकीकडे महायुतीचे अनेक बडे नेते सेना, भाजपाला २२० जागा मिळतील असा दावा ठोकत असताना, शिवसेनेचे जेष्ठ नेते, तथा माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी महायुती २०० जागांच्या पुढे जाणार नाही,असे मत व्यक्त केले आहे. ‘मी अनेक निवडणुका पाहिल्या आहेत. कुठल्याही निवडणुकीबाबत निश्चित काही सांगणं अशक्य असतं. त्यामुळं महायुती २०० जागांचा आकडा पार करेल असं मला वाटत नाही,’ असं जोशी यांनी म्हटलं आहे.
www.konkantoday.com