नाणार रिफायनरीबाबत मुख्यमंत्री सकारात्मक ,दोन्ही बाजू ऐकून घेणार
रत्नागिरी जिल्ह्यातील तरुणांना रोजगार मिळण्यासाठी या ठिकाणी चांगले प्रकल्प येणे गरजेचे आहे .नाणार येथील ग्रीन रिफायनरी प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकारात्मक आहेत. निवडणूक झाल्यानंतर ते प्रकल्प विरोधकांची बाजू तसेच प्रकल्प समर्थकांचीही बाजू ऐकून घेणार आहेत. प्रकल्पाला विरोध करणारे स्थानिक आहेत की बाहेरचे त्याचीही माहिती घेतली जाणार आहे. यासाठी एका कमिटीचीही नेमणूक करण्यात येणार आहे त्यानंतर स्थानिक जनतेची बाजू ऐकून घेऊन त्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे असे भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी रत्नागिरी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले .
www.konkantoday.com