मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरचे चाक लँडिंगच्या वेळी रुतले मातीत
अलिबाग – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरला आज पेण येथे अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. हेलिकॉप्टर पेण येथील बोरगाव येथे लॅण्ड झाल्यावर हेलिपॅडवरील मातीत हेलिकॉप्टरची चाके रुतली. त्यामुळे पायलटचे हेलिकॉप्टरवरील नियंत्रण सुटले. मात्र प्रसंगावधान दाखवत पायलटने पुन्हा हेलिकॉप्टरवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे मोठा अपघात टळला.मुख्यमंत्र्यांसह हेलिकॉप्टरमधील सर्वजण सुखरूप असल्याचे कळते.