संजीवनी युवक हितवर्धक मंडळाचा विद्यार्थी गुणगौरव व कुटुंब मेळावा मुंबईत संपन्न
मुंबई:दापोली तालुक्यातील संजीवनी युवक हितवर्धक मंडळ मावळतवाडी मौजे फणसू आयोजित विद्यार्थी गुणगौरव आणि कुटुंब मेळावा नुकताच मुलुंड गोशाळा येथे विद्यार्थी, पालक, महिलावर्ग व समाजबांधवांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
स्वामी विवेकानंद म्हणतात की माणसांतील पुर्णत्वाचा अविष्कार म्हणजे शिक्षण होय. मानवी जीवनाचा सर्वांगीण विकास हा त्याच्या शिक्षणावर अवलंबून असतो.शिक्षण हे कौटुंबिक,आर्थिक,सामाजिक व मानसिक परिवर्तनाचे एक महत्वपूर्ण साधन आहे. मानवी जीवनाच्या विकासाचा तो पाया आहे. सुसंस्कृत चारित्र्यसंपन्न व स्रुजनशील पिढी फक्त शिक्षणातूनच घडविता येते.म्हणूनच शिक्षणातून माणूस स्वतःसोबत कुटुंबाचा आणि समाजाचा देखील विकास करु शकतो. या विचाराने प्रेरित झालेले संजीवनी युवक हितवर्धक मंडळ सातत्याने विविध सामाजिक उपक्रम राबवून आपले कर्तव्य बजावत आहे.
आजचा काळ हा पूर्वीसारखा राहिला नाही आहे ,सध्याचं युग हे कॉम्पिटिशनचे आहे, आणि आताची पिढी ही खूप हुशार आहेत, त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यासोबत मनमोकळे पणाने बोलून त्याला समजून घेणे गरजेच आहे, त्यांच्यातील कला कौशल्य निरखुण त्याला कोणत्या गोष्टीत किंवा क्षेत्रात रस आहे आवड आहे हे जाणून घेऊन पालकांनी त्यांना योग्य ते मार्गदर्शन करणे व त्याची प्रेरणा देणे गरजेच आहे, तसेच विद्यार्थ्यांनी ही योग्य तो सल्ला मार्गदर्शन घेऊन आपल्या भविष्यातील यशाची ईमारत उभी करायची आहे आणि यासाठी महत्त्वाचे आहे ते फक्त आणि फक्त शिक्षण, कारण आपले शिक्षण हेच आपल्या भविष्याच्या यशाच्या ईमारतीचा पाया आहे, यासाठी विद्यार्थ्यांनी आपले ध्येय ,धोरण निश्चित करून ते मिळविण्याच्या दिशेने वाटचाल करून त्यासाठी लागणाऱ्या शिक्षणाची चिकाटी कायम ठेवून सातत्याने प्रयत्न करावे.याशिवाय मान्यवरांनी शिक्षणाची व्याख्या नेमकी काय आहे या संदर्भातील अत्यंत बोलकी उदाहरणे दिली. UPSC ,MPSC, IAS, IPS, कलेक्टर , अशा मोठ्या पदव्या मिळवण्याची जिद्द आपल्या विद्यार्थ्यांना ठेवायला हवी, तरच काही नवीन बदल आपल्या समाज्यात घडून आलेला दिसेल.आपण ज्या समाज्यात व राष्ट्रात राहतो आणि वावरतो त्या समाजाचं व राष्ट्राचे ही आपण काहीतरी देणं आहोत हे ही आपण विसरू नये. आपल्या शिक्षणाचा आपल्या समाजाच्या फायद्यासाठी सामाजाच्या विकासाठी व्हावा याचाही विचार आपण केला पाहिजे.
यावेळी विचार मंचावर समाज सेवक श्री .प्रदीपजी मोगरे,कुणबी समाज विकास संघ ,(रजि.) मुलुंडचे अध्यक्ष श्री.उमेशजी पाटील, श्री. तानाजी निकम,श्री.दिलीपजी भुवड, श्री. निखीलजी हारावडे, श्री.सुनीलजी चव्हाण, श्री.सागरजी रेमजे, श्री. मानिषजी लोंढे, श्री.अनंतजी हुमणे, श्री. महादेवजी मोरे, श्री.संतोषजी मोरे, श्री. तानाजी भागणे साहेब, तसेच मुंबई -मुलुंड विभागातील सामाजिक कार्यकर्ते श्री.दिनेशजी जाधव,श्री अजितजी कांबळे, श्री.स्वप्निलजी साळुंखे, श्री खेम-मनाई पतसंस्था फणसूचे सचिव श्री. बाळूजी विचले, फणसू ग्रामविकास मंडळाचे सल्लागार श्री. राजेंद्रजी विचले, व सचिव श्री. कल्पेशजी शिगवण आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.दत्तारामजी ऊके,अध्यक्ष श्री.राजेशजी राऊत,सचिव श्री.संजयजी टेमकर,कार्याध्यक्ष श्री.चंद्रकांतजी ऊके,ग्रामीण अध्यक्ष श्री.शंकरजी ऊके आणि सहकारी,मुंबई मंडळ मावळत वाडीचे युवा प्रमुख श्री.प्रदिपजी ऊके, कुं.सुनेशजी ऊके, आणि सहकारी.तसेच महिला प्रतिनिधींनी प्रचंड मेहनत घेऊन सदर कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न केला.
विशेष म्हणजे या कार्यक्रमाला ग्रामीण मंडळाचेही पदाधिकारी उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री.रुपेश ऊके यांनी केले.