कायमस्वरूपी बऱ्या झालेल्या मनोरुग्णाला मिळणार हक्काचे घर
कायमस्वरूपी बरे झालेल्या मनोरुग्णांना आता मायेची ऊब देणारे नवीन घर मिळणार आहे. चेन्नई येथील दि बॅनियन संस्थेच्या पुढाकाराने रत्नागिरीत मायेची उब देणारे हे नवीन घर उपलब्ध करून देण्यात आले आहे.रत्नागिरी येथील प्रादेशिक मनोरुग्णालयात मनोरुग्णांना उपचारासाठी दाखल केल्यानंतर ते बरे होतात परंतु त्यांचे नातेवाईक त्यांना घरी परत घेऊन जात नाहीत यामुळे या रूग्णांना येथेच राहावे लागतेरत्नागिरी रुग्णालयात असे तीस रुग्ण आहेत अशा रुग्णांसाठी चेन्नई येथील दी डेनियल संस्थेने पुढाकार घेतला सध्या येथील चार महिला रुग्णांची या घरात सोय करण्यात आली असल्याची माहिती संस्थेच्या समन्वयिका आकांक्षा राघव यांनी दिली. संस्थेने घेतलेल्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
www.konkantoday.com