
नदीत मासे पकडण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू
चिपळूण: शहरातील पागमळा येथील मारुती मंदिराच्या मागील बाजूस असणार्या नदीत मासे पकडण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली.
याप्रकरणी येथील पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सोहम राजेश सुतार (वय 26, चिपळूण) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. सोहम यास दारुचे व्यसन होते. त्याला मासे पकडण्याचा छंद होता. तो दारुच्या नशेत मासे पकडण्यासाठी गेला असताना पाय घसरून पाण्यात पडला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.