
डॉक्टरांअभावी अनेक १०८ रूग्णवाहिका बंद पडण्याच्या मार्गावर
रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यात शासनाने १०८ या रूग्णवाहिका रूग्णांसाठी उपलब्ध करून दिलासा दिला होता.परंतु गेले काही दिवस रूग्णालयात मोठ्या प्रमाणावर डॉक्टरांची संख्या कमी झाली आहे. यामुळे डॉक्टरां अभावी जिल्ह्यातील काही १०८ रूग्णवाहिका बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.रत्नागिरी जिल्ह्यातील जनतेचे आरोग्य चांगले रहावे, त्यांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नयेत यासाठी आघाडी शासनाच्या काळात १०८ रूग्णवाहिकांचे वाटप करण्यात आले. रत्नागिरी जिल्ह्यात १०८ च्या १७ अद्यावत अशा रूग्णवाहिका असून त्यापैकी केवळ पाच रूग्णवाहिका डॉक्टर उपलब्ध असल्याने सुरू आहेत. अन्य रूग्णवाहिका डॉक्टरांअभावी बंद पडल्या असल्याने रूग्णांचे हाल होवू लागले आहेत. जिल्ह्यात मुसळधार पाऊस असताना तापासह विविध आजाराचे रूग्ण सध्या वाढले आहेत. त्यांना हॉस्पिटलपर्यंत आणण्यासाठी १०८ हा चांगला पर्याय होता. परंतु या रूग्णवाहिका डॉक्टर नसल्याने बंद ठेवण्यात आल्या असून त्वरित डॉक्टरांची भरती करून त्या पुन्हा सुरू कराव्यात अशी मागणी जनतेकडून होवू लागली आहे.
www.konkantoday.com