आंतरमहाविद्यालयीन सुगम संगीत स्पर्धेचे आयोजन
रत्नागिरी:मुंबईतील दादर-माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे आंतरमहाविद्यालयीन सुगम संगीत स्पर्धेचे आयोजन केले आहे. प्राथमिक फेरीसाठी यंदा रत्नागिरीसह प्रथमच दापोली केंद्र नव्याने सुरू होत आहे. रत्नागिरीची स्पर्धा खल्वायन व अखिल चित्पावन ब्राह्मण मंडळाच्या मदतीने २२ सप्टेंबरला ल. वि. केळकर वसतिगृहात होईल. दापोलीतील स्पर्धा संस्कार भारतीच्या मदतीते १५ सप्टेंबरला सकाळी ९ वा. जालगाव येथील श्रीराम बलवर्धक हॉलमध्ये होईल. स्पर्धा कनिष्ठ, वरिष्ठ, विधी महाविद्यालय, अभियांत्रिकी, डीएड, बीएड कॉलेज, शासकीय तंत्रनिकेतन, आयटीआय आदींचे विद्यार्थी स्पर्धेत भाग घेऊ शकतात. आकाशवाणी व दूरदर्शन मान्यताप्राप्त कलावंत तसेच या स्पर्धेत यापूर्वी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवणार्या विद्यार्थ्यांना भाग घेता येणार नाही.
स्पर्धेत फक्त मराठी किंवा हिंदी भाषेतील गीत, गझल, भावगीत, भक्तिगीत किंवा अभंग सादर करता येईल. पाच मिनिटांचा अवधी आहे. हार्मोनियम, तबला, तानपुरा ही वाद्ये साथ संगतीसाठी वापरता येतील. साथीदारांची व वाद्यांची व्यवस्था संस्थेतर्फे करण्यात येईल. स्पर्धक स्वखर्चाने स्वतःच्या पसंतीचे वादक आणू शकतील.
प्राथमिक स्पर्धेतून निवडलेल्या स्पर्धकांची अंतिम फेरी दादर-माटुंगा सांस्कृतिक केंद्र, दादर-मुंबई येेथे २२ डिसेंबर २०१९ रोजी घेण्यात येईल. प्राथमिक फेरीतील सर्व स्पर्धकांस सहभागाचे प्रमाणपत्र देण्यात येईल. दापोली येथे १३ सप्टेंबरपर्यंत नंदू कोपरकर व रत्नागिरीसाठी २० सप्टेंबरपर्यंत श्रीनिवास जोशी यांच्याकडे नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे.
www.konkantoday.com