कुवारबांव येथील वर्तक कुटुंबियाची पर्यावरणपुरक आगळी गणेशमूर्ती
रत्नागिरी: गेली काही वर्षे कुवारबांव येथील संजय वर्तक व त्यांच्या कुटुंबियानी पर्यावरणपुरक साधनांचा वापर करून गणेशमूर्ती बनविण्याचे प्रयोग सातत्याने केले असून यावर्षी देखील त्यांनी ही परंपरा कायम ठेवली आहे. यावर्षी त्यांनी १० फूट उंचीची मूर्ती बनविली असून ही मूर्ती त्यांनी सुका पुट्ठा, कागद, गव्हाच्या पिठाची चिक्की यापासून बनविली असून त्यावर फणसाच्या झाडाची पाने, सुपारीच्या पानांची इरी, कुरडुची फुले आदींचा वापर केला आहे. यामुळे ही मूर्ती पर्यावरणपुरक झाली आहे. यावर्षीच्या सजावटीमध्ये त्यांनी समुद्रविश्व दाखवले असून मानवाकडून होणार्या जलप्रदूषणापासून समुद्री जीवाला वाचविण्यासाठी बाप्पाचे म्हणजे गणेशाचे मत्स्यरूप त्यांनी दाखविली आहे. तसेच सजावटीमध्ये त्यांनी पुठ्ठ्यापासून ऑक्टोपसही बनविला आहे. या गणेशमूर्तीपासून व सजावटीपासून आम्ही जनतेला जलप्रदूषण टाळा हा संदेश देत आहोत असे वर्तक कुुटुंबियांचे म्हणणे आहे. ही सजावट करण्यासाठी संजय वर्तक यांना त्यांची पत्नी व मुले यांचे मोठे सहकार्य लाभले आहे.
www.konkantoday.com
_______________________
कोकण टुडे वर जाहिरातीसाठी संपर्क-९५०३९५५९५९